top of page

Validity Certificate – वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण माहिती | AapleJob.in

Validity Certificate (वैधता प्रमाणपत्र): जातीचे प्रमाणपत्र पडताळणी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, कोठे अर्ज करावा आणि वैधता कालावधी याची संपूर्ण माहिती येथे वाचा – AapleJob.in.

✅ Validity Certificate म्हणजे काय?

वैधता प्रमाणपत्र हे एक अधिकृत शासकीय कागदपत्र आहे, जे उमेदवाराच्या जातीच्या (Caste) अथवा आरक्षणाशी संबंधित कागदपत्रांची प्रमाणिकता तपासून दिले जाते.

📌 कोणत्या ठिकाणी लागते?

  • सरकारी व अर्धसरकारी नोकऱ्यांसाठी 

  • शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत (उदा. BE, B.PHARMACY, BED, LLB, MBBS,NURSING ALL MEDICAL COURSE )

  • आरक्षणाच्या फायद्यासाठी (SC, ST, OBC, VJ, NT-D, NT-B,NT-C )

⏳ वैधता कालावधी

  • आयुष्यभर वैध (Lifetime Valid) – एकदा प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

कोठे अर्ज करावा?

  • ​ऑनलाईन अर्ज भरून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (Caste Scrutiny Committee) कडे अर्ज जमा करावा.

  • महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या समित्या उपलब्ध आहेत.

✅ जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhaar Card)

  • जातीचे प्रमाणपत्र (अर्जदाराचे)

  • टी.सी. (Transfer Certificate – अर्जदाराचे)

  • प्रवेश निर्मम उतारा (प्राथमिक)

  • वडिलांची टी.सी. व प्रवेश निर्मम उतारा

  • आजोबांचा टी.सी. व प्रवेश निर्मम उतारा

  • कोटवर बुक नक्कल किंवा वारस हक्क नोंदणी

  • ₹100 चे दोन बॉण्ड – 1) वडिलांचे शपथपत्र  2) वंशावळ

  • कॉलेज कव्हरिंग लेटर (Covering Letter)

  • फॉर्म नंबर 15 (कॉलेज मधून)

  • कॉलेज बोनाफाईट

  • आजोबांचा मृत्यूचा दाखला (असल्यास)

  • जात वैधता प्रमाणपत्र (नातेवाईकाकडे असल्यास)

  • जातीतील ५ आडनावांची यादी

  • इतर महसूल पुरावे (Revenue Proofs, जमीन / मालकी संबंधित कागदपत्रे)

aaplejob
bottom of page