आपले जॉब
सरकारी भरती माहिती पोर्टल
शेतासाठी 90% अनुदानावर तार कुंपण योजना | पूर्ण माहिती

योजनेचा उद्देश
-
शेतातील पिकांचे वन्य प्राणी व जनावरांपासून संरक्षण करणे.
-
पिकांचे नुकसानीचे प्रमाण कमी करून उत्पादन वाढवणे.
-
शेतकऱ्यांना आर्थिक तोटा टाळणे व उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणणे.
-
शेतात सुरक्षित वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांचा उत्साह व विश्वास वाढवणे.
योजनेचे फायदे
-
शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून रक्षण होते.
-
पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
-
शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात.
-
मजबूत तार कुंपणामुळे प्राणी व चोरीपासून शेत सुरक्षित राहते.
पात्रता व अटी
-
अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
-
शेतजमीन कार्यदेशीर मालकीची किंवा भाडेपट्ट्याची असावी.
-
शेत अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक.
-
शेतजमीन वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत असावी.
-
पिकांच्या नुकसानीचा पुरावा असणे आवश्यक.
-
ग्रामविकास समिती/संयुक्त वन समितीची संमती आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
-
शेतकऱ्याचा ७/१२ उतारा (महाभूलेख)
-
८अ
-
आधार कार्ड
-
फार्मर आयडी
-
जात प्रमाणपत्र (SC,ST साठी)
-
बँक पासबुक ची झेरॉक्स
-
एकत्रित मालकी असल्यास संमती पत्र
-
ग्रामपंचायतीचा ठराव / दाखला
-
स्वघोषणापत्र
-
वन अधिकाराचा दाखला (लागल्यास)
अर्ज कसा करावा
-
ऑनलाईन अर्ज भरायचा आहे
-
अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्याला योजनेचा लाभ मंजूर केला जातो.
-
अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.
