top of page

🎓 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (2025–26)

1. Post-Matric Scholarship (SC / ST / OBC / SBC / VJNT / PwD)

  • अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती व अपंग विद्यार्थ्यांसाठी.

  • शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क संपूर्णपणे भरपाई.

  • दर महिन्याला ₹550 ते ₹1,200 पर्यंत भत्ता.

  • काही योजनांमध्ये ग्रंथसाहित्य भत्ता, अभ्यासभ्रमण भत्ता, आणि योजनेवर आधारित hostel allowance.

2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना (EBC / SEBC)

  • आर्थिक दुर्बल घटक व सामाजिक मागासवर्गांसाठी.

  • 50% ते 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ.

  • विविध विभागांमार्फत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी लागू.

3. एकलव्य शिष्यवृत्ती योजना

  • पदवी परीक्षा (BA, BCom, BSc) मध्ये किमान 60% गुण आवश्यक.

  • वार्षिक उत्पन्न ₹75,000 पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

  • प्रति वर्ष ₹5,000 ची शिष्यवृत्ती.

4. ओपन मेरिट शिष्यवृत्ती योजना

  • 10वीमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

  • उच्च माध्यमिक आणि पदवीपूर्व शिक्षणासाठी.

  • दर महिन्याला ₹100 ची शिष्यवृत्ती.

5. समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना

  • अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गातील 9वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

  • दर महिन्याला ₹4,500 पर्यंत शिष्यवृत्ती (10 महिने).

6. अन्य उपयुक्त योजना

  • MSRTC विद्यार्थी बस पास योजना: शाळा आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास.

  • अनाथ विद्यार्थी फी माफी योजना: अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ.

  • महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजना: एकाच पोर्टलवर सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येतो.

📋 आवश्यक कागदपत्रे:

  • डोमिसाइल (राहिवासी) प्रमाणपत्र

  • उत्पन्न प्रमाणपत्र

  • जातीचा दाखला (लागू असल्यास)

  • मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक

  • कॉलेज किंवा शाळेचा बोनाफाईड दाखला

  • फी पावती

  • बँक पासबुक झेरॉक्स

  • आधार कार्ड

  • राशन कार्ड 

  • मागील शाळेची टी.सी.

🧾 अर्ज प्रक्रिया:

  1. विद्यार्थ्याने ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी.

  2. आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत.

  3. अर्ज योग्यरित्या भरून सबमिट करावा.

  4. अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी.

aaplejob
bottom of page