top of page

10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2025

सरकारी नोकरी, महाराष्ट्र भरती, प्रवेशपत्र, निकाल, योजना, शिष्यवृत्ती, Aaple Job

Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2025-27 Registration – महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025-27 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) :

1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी

2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी

3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी

4) जे विद्यार्थी सन 2025 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.

5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)

6) विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

7) विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

8) अर्जदार विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ग्रामीण भागातील म्हणजेच खेळ्या गावातील असा तर 60% च्या पुढे गुण पाहिजे, तर शहरी भागातील असाल तर 70% च्या पुढे टक्के पाहिजे. तरच अर्ज करा.

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ब) :-

1) 10 वी ची गुणपत्रिका

2) 11 वी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)

3) आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)

4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate)

5) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)

7) दिव्यांग असल्यास दाखला

8) अनाथ असल्यास दाखला

अर्ज कसा करावा (क) :- 

1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.

2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025-27 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

3) अर्जासोबत ‘ ब ‘ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

 

bottom of page