top of page

Academic Bank of Credits (ABC Card)
म्हणजे काय? – संपूर्ण माहिती

Academic Bank of Credits (ABC) अधिकृत लोगो – डिजिटल क्रेडिट ट्रान्सफर प्रणाली”

🔹 योजनेचे नाव: Academic Bank of Credits (ABC)

🔹 योजनेचा उद्देश: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट (गुण) सुरक्षित ठेवणे व भविष्यात वापरणे

🔹 कार्यान्वयन करणारा विभाग: विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), भारत सरकार

🔹 घोषणा: नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत

🧾 ABC कार्ड म्हणजे काय?

ABC म्हणजे Academic Bank of Credits – एक डिजिटल अकाऊंट जिथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण (credits) जतन होतात. यामध्ये विद्यार्थी ज्या-ज्या कोर्ससाठी शिकले, त्याचे क्रेडिट्स जमा होत राहतात. हे क्रेडिट्स भविष्यात दुसऱ्या कोर्ससाठी किंवा कॉलेज/युनिव्हर्सिटी बदलताना वापरता येतात.

🎯 योजनेची वैशिष्ट्ये

✅ शैक्षणिक गुण ऑनलाइन जमा व सुरक्षित
✅ कोर्समध्ये multiple entry-exit ची सुविधा
✅ एकाच विद्यार्थ्याला 12 अंकी यूनिक ABC ID
✅ एका कोर्समधील गुण दुसऱ्या कोर्ससाठी वापरण्याची सोय
✅ ऑनलाईन डिजिटल अकाऊंटसारखी सुविधा
✅ विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून पुढे सुरु करू शकतो

📌 नोंदणी कशी करावी?

  1. 🌐 वेबसाईटला भेट द्या: www.abc.gov.in

  2. “Student” निवडा व साइन अप करा

  3. आधार कार्ड व मोबाईल OTP द्वारे खाते सत्यापित करा

  4. आपली शैक्षणिक माहिती भरून सबमिट करा

  5. तुमचा ABC ID / ABC Card तयार होईल

📁 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड

  • मोबाईल नंबर

  • शाळा / कॉलेजची माहिती

  • ईमेल (जर असेल तर)

🎓 कोन पात्र आहे?

  • कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा कॉलेजमधील विद्यार्थी

  • पदवी / पदव्योत्तर / डिप्लोमा कोर्स शिकणारे विद्यार्थी

bottom of page