आपले जॉब
सरकारी भरती माहिती पोर्टल

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना केवासी अपडेट

1. e-KYC प्रक्रिया का आवश्यक आहे?
-
पारदर्शकता वाढवणे: लाभार्थी महिला कोणत्या योजनेत लाभ घेत आहेत याची स्पष्ट नोंद ठेवण्यासाठी.
-
नियमित आर्थिक लाभ: e-KYC पूर्ण झाल्यानंतर महिलांना योजनेंतर्गत आर्थिक लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतील.
-
इतर शासकीय योजनांसाठी मदत: भविष्यातील इतर सरकारी योजना किंवा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण (e-KYC) आधारभूत ठरेल.
2. e-KYC प्रक्रिया कुठे करावी?
-
अधिकृत वेबसाइट LINK खाली दिली आहे.
-
वेबसाईटवर जाऊन ‘e-KYC’ विभागात आपल्या आधार नंबर आणि बँक खाते माहितीसह लॉगिन करावे.
-
ओटीपी (OTP) / आधार प्रमाणीकरणद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी.
3. e-KYC साठी आवश्यक कागदपत्रे
-
आधार कार्ड: आधार नंबर आणि आधार कार्डची माहिती बरोबर असावी.
-
बँक खाते माहिती:
-
पासबुक किंवा ATM कार्ड, ज्यावर महिलांचे नाव आणि बँक खाते क्रमांक स्पष्ट दिसेल.
-
-
सध्या कोणत्याही इतर कागदांची आवश्यकता नाही, कारण e-KYC प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण मुख्य आहे.
टीप: कोणतीही आर्थिक मागणी (फीस) या प्रक्रियेसाठी नाही. आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहावे.
4. e-KYC प्रक्रिया केल्याने होणारे फायदे
-
अनियमित लाभ रोखणे: आर्थिक लाभ थेट बँक खात्यात पाठवले जातील, त्यामुळे गडबड कमी होईल.
-
भविष्यातील योजना लाभ: अन्य सरकारी योजनांसाठी e-KYC आधीच पूर्ण असल्याने फायदा मिळेल.
-
सुलभता: ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे महिला घरबसल्या e-KYC पूर्ण करू शकतात.
-
सुरक्षितता: आर्थिक लाभ थेट खात्यात येणे, भ्रष्टाचार किंवा दुरुपयोग टाळणे.
5. महिला आणि बालविकास मंत्रालयाचे आवाहन
-
पुढील दोन महिन्यांत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक.
-
कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास त्यास बळी पडू नये.
-
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींना योजनेचा आर्थिक लाभ नियमित मिळू लागेल.